Home Cities धरणगाव नाभिक समाजातर्फे विविध मागण्यांचे निवेदन

नाभिक समाजातर्फे विविध मागण्यांचे निवेदन


4764d5ba cff0 4a9f 90bc 2a962a58270b
 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील समस्त नाभिक समाजातर्फे विविध मागण्यांचे निवेदन आज धरणगाव नायब तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी या नाभिक समाजाच्या मागण्यांना पाठींबा दिला.

 

नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांना देण्यात आलेल्या निवेदन, नाभिक समाजाला एसटी संवर्गात समाविष्ट करणे, संत सेना महाराज आर्थिक महामंडळ स्थापित करणे, प्रमुख ठिकाणी कॉम्प्लेक्समध्ये सलून दुकानासाठी जागा आरक्षित ठेवणे, शिवा काशीद यांचा पन्हाळा गडावरील स्मारकास पर्यटन स्थळाचा दर्जा देणे, शिवरत्न जिवाजी महाले यांचे प्रतापगडावर स्मारक उभारून पर्यटनस्थळ विकसित करण्यात यावे, आशा विविध मागण्यांचा समावेश आहे.

 

यावेळी शिवसेनेतर्फे नाभिक समाजाचा मागण्या शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ व नूतन विकास सोसायटीचे चेरमन व शिवसेना शहर संघटक धिरेंद्र पुरभे यांनी पाठिंबा दिला. यावेळी उपस्थित नाभिक समाज अध्यक्ष सतीश बोरसे, महेश निकम , अशोक झुझाराव, प्रश्नांत फुलपगार विनोद झुझाराव सुधाकर फुलपगार राजेंद्र बोरसे दिलिप गायकवाड, गोपाल वारुळे, प्रवीण निकम, मोहन फुलपगार, आनंदा फुलपगार, विजय फुलपगार, चंद्रकांत फुलपगार, गोपाल फुलपगार, भरत परदेशी, हेमंत फुलपगार,सचिन ठाकरे, रामचंद्र कुवर सर्व समाज बांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound