जळगाव प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनीतील तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. मात्र नातेवाईकांना मृतदेह शवविच्छेदन न करतांचा घरी नेले, त्यामुळे एमआयडीसी पोलीसात घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृतदेह रात्री 8 वाजता पुन्हा जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आला. याबाबत रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
याबाबत माहिती अशी की, पांडू मारूती आठरे (वय-26) रा. सुप्रिम कॉलनी हा मालवाहू चालक आहे. गेल्या सहा वर्षांपासून काम करत आहे. आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास तीन मित्रांसोबत मेहरूण तलाव येथे फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी मेहरूण तलावावर फोटो काढत असतांना त्याचा पाय घसरल्याने पाण्यात बुडाला. त्यावेळी सोबत असलेल्या मित्रांनी त्याला तातडीने पाण्याबाहेर काढले. खासगी वाहनाने शहरातील गणपती रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पुन्हा तेथून ऑर्किड येथे आणण्यात आले. त्यावेळी ऑर्कीडनंतर त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले व घरी घेवून जाण्यास सांगितले. त्यांनी मयत पांडू आठरेचा मृतदेह घरी आणला.
दरम्यान, मेहरूण तलावात तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसी पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हा रूग्णालय गाठले मात्र जिल्हा रूग्णालयात मृतदेह आढळून न आल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली. रात्री 7 वाजता एमआयडीसी पोलीसांना मृतदेह सुप्रिम कॉलनीत आणल्याचे समजल्यानंतर त्यांनी लागलीच मयताच्या घरी जावून चौकशी केली. तर मयत असल्याचे सांगितले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पुन्हा जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात आणण्यात आला. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ, विवाहित बहिण असा परीवार आहे. दरम्यान रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.