Home Cities चोपडा पूरग्रस्त भागात चोपडा येथील टीमद्वारे मदत कार्य

पूरग्रस्त भागात चोपडा येथील टीमद्वारे मदत कार्य

0
109

WhatsApp Image 2019 08 18 at 7.09.16 PM

चोपडा, प्रतिनिधी | कोल्हापुर येथील पुरग्रस्त लोकांच्या घरात एकही वस्तु शिल्लक नाही. त्यांना वैद्यकीय व जीवनाश्यक वस्तूंंची अरुणभाई गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने मदत कार्य केले आहे.

 

चोपडा येथून डॉ. पवन पाटील, डॉ. विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेन्द्र पाटील यांच्यासह गांवमाझा चे पत्रकार मिलिंद सोनवणे यांच्या टीमने मदत कार्य करत आहेत. चोपडा येथून कपडे, साडी, चोली आणि लहान मुलांना शालेय दप्तर, आणि चादरी आणि मेडिसिन घेऊन या टीमने सांगली, कोल्हापुर, डीग्रस आणि धमाने या गावी जाऊन आरोग्य सेवा दिली. यात त्यांनी चेकअप करुन औषधींचे वाटप केले. धमाने या गांवातुन टीम परत येत असतांना गावकऱ्यांच्या डोळ्यातुन अश्रु तरळत होते.


Protected Content

Play sound