भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील महर्षी व्यास माध्यमिक विद्यालयाला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आदी जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दि. 19 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता रौप्य महोत्सव साजरा करण्यात येत असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, विद्यालयाच्या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते एस. डी. सोनवणे ज्युनियर कॉलेजचे उद्घाटन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यध्यापिका यामिनी सोनवणे यांनी दिली आहे. तसेच विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. रौप्य वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने संपूर्ण वर्षभर विद्यालयामध्ये क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान रांगोळी स्पर्धा, पथनाट्य, विविध व्याख्याने, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान घेण्यात आले होते.
यांची असणार उपस्थिती
याचबरोबर, सोमवार महर्षी व्यास माध्यमिक विद्यालय वेल्हाळे येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर, शिवसेना रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर, जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, रावेर लोकसभा खासदार रक्षाताई खडसे, नाशिक विभागाचे शिक्षक आ.किशोर दराडे, आ.किशोर पाटील, आ. रमेश पाटील, आ.संजय सावकारे, आ. चंद्रकांत सोनवणे, माजी आ. संतोष चौधरी, माजी आ. दिलीप भोळे, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्यासह जिल्ह्यातील सर्व राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या रौप्य महोत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष सोनवणे यांनी दिली आहे.
आवाहन केले
परिसरातील नागरीकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आदी जनता शिक्षक प्रसारक मंडळ व महर्षी व्यास माध्यमिक विद्यालय संचालक मंडळ व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.