Home Cities पारोळा एच. पी. पाटील विद्यालयात ध्वजारोहणसह वृक्षारोपण

एच. पी. पाटील विद्यालयात ध्वजारोहणसह वृक्षारोपण

0
39


h.p.patil school

पारोळा प्रतिनिधी । येथील अंबापिंप्री गावातील एच.पी पाटील माध्यमिक विद्यालयात दि. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण भारतीय जवानांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जवान निलेश पाटील, समाधान जाधव व भिकान कोळी हे तीन जण गावात सुट्टीनिमित्ताने आले होते. ध्वजारोहण हे त्यांच्या हस्ते करण्यात यावे असे गावातील तरुणांची इच्छा असल्यामुळे त्यांना हा मान देण्यात आला. प्रत्येक कठीण प्रसंगात भारतीय जवानांना पुढे असतात. तसेच आपले ही कर्तव्य असल्यामुळे त्यांना तिरंगाचे ध्वजारोहण करावे.

याप्रसंगी 370 वृक्षारोपण करायला सुरुवात केली आहे. आणि तसेच जवानांचे हात घट्ट होण्यासाठी त्याच्या हातावर रक्षाबंधननिमित्ताने राखी विद्यार्थ्यांनी जवानांना बांधली आहे. यावेळी विद्यालयाचे स्थानिक चेरमन गोविंदराव पाटील, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी, पोलीस पाटील, तसेच गावातील पदधिकारी, माजी विद्यार्थी तसेच गावातील नागरिक उपस्थितीत होते. आणि जवानांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत होता.


Protected Content

Play sound