लक्ष्मी नागरी पतसंस्थातर्फे पूरग्रस्तांना मदत निधी

faizapur

 

फैजपूर प्रतिनिधी। येथे लक्ष्मी नागरी पतसंस्थेची वार्षिक सभा नुकतीच घेण्यात आली असून ती नरेंद्र नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत निधी देण्याचा प्रस्ताव ही मांडण्यात आला असून सभासदांनी एकमुखाने होकार दिला आहे.

याबाबत माहिती अशी की, तसेच या सभेत सभासदांनी एकमुखाने होकार देऊन सभासदांना मिळणाऱ्या लाभांश मधून 2 टक्के रक्कम, संस्थेच्या सामाजिक उपक्रम निधीतून काही रक्कम तसेच संचालक मंडळाची वैयक्तिक मदत व सहकारी मित्रपरिवार या सर्वांकडून एकत्रित करुन सुमारे एक लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही रक्कम कायदेशीररित्या पूरग्रस्तांना पोहचविण्यात येणार आहे. यावेळी फैजपूर विभाग प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी फैजपूर शहरातील ४१ गुणवंतांचा सत्कार तसेच विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या आईवडिलांचा सत्कार डॉ. अजित थोरबोले, उपवन संरक्षक पालचे आर.एस.भवर व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संस्थेच्या प्रगतीचा आढावा चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी सभेत मांडला. सर्व विषय एक मताने मंजूर केले. सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. लक्ष्मी पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी पार पाडली असून या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले. त्यात गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, कन्यारत्न पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पाणी अडविण्यासाठी बंधारा या उपक्रमाबद्दल प्रांत डॉ. अजित थोरबोले यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले. व पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाइल वापरणे टाळा, सुसंवाद साधण्याची कला अवगत करा, आपली शक्ती योग्य ठिकाणी गुणवता, शिक्षणाबरोबर व्यवहारात प्रवीण रहा आदी महत्त्व पूर्ण बाबी समजुन सांगितल्या. तसेच भवर साहेब यांनीही आधुनिक साधनांचा वापर सकारात्मक पद्धतीने करण्याचा सल्ला दिला. याचबरोबर पाहुण्याचे हस्ते महाराष्ट्र शासनाचे ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.

लक्ष्मी सा मिलच्या सभागृहात संपन्न झालेल्या या सभेस संचालक कमलाकर भंगाळे, सुनील वाढे, विजयकुमार परदेशी, डॉ. गणेश चौधरी, प्राचार्य आर.एल.चौधरी, सुरेश परदेशी, अनिल नारखेडे, खेमचंद नेहते, चंद्रशेखर माहुरकर, रेवती पाटील, भास्कर बोंडे, आरएफओ महेश महाजन रावेर, नितीन चौधरी, हर्षद महाजन न्हावी, केतन किरंगे, सुनील नारखेडे, निळू सराफ, मसाका युनियन अध्यक्ष किरण चौधरी व आदी उपस्थितीत होते. सूत्रसंचालन व्यवस्थापक जयश्री चौधरी यांनी केले तर आभार व्हा. चेअरमन मनोजकुमार पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुभाष गलवाडे, राजेंद्र मानेकर, चंदू पाटील, राजू मिस्त्री यांनी परिश्रम घेतले.

Protected Content