अण्वस्त्राचा वापर भविष्यातील परिस्थितीवर निर्भर : राजनाथ सिंह

ece0x9bucaawjdc 201908283097

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पोखरणमध्ये मोठे विधान केलेले आहे. आजपर्यंत भारताने कधीही अण्वस्त्राचा वापर पहिल्यांदा केला नाही पण भविष्यात काय घडेल ते तेव्हाच्या परिस्थितीवर निर्भर आहे, असे सूचक विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात केले आहे.

 

राजनाथ सिंह म्हणाले, “आजपर्यंत आपले अण्वस्त्र धोरण हे ‘नो फर्स्ट युज’ असे राहिले आहे. मात्र, भविष्यात काय घडेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल” दरम्यान, राजनाथ यांनी याबाबत एक ट्विटही केले आहे. त्या ते म्हणातात, “पोखरण ही अशी जागा आहे ज्यामुळे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला आण्विक शक्ती म्हणून ओळख मिळवून दिली. तसेच यावेळी त्यांनी ‘नो फर्स्ट युज’ हे तत्वही निश्चित केले. भारत या तत्वाचे कसोशीने पालन करीत आहे मात्र, भविष्यात काय घडेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. दोन्ही देशातील वाढता तणाव लक्षात घेता संरक्षण मंत्र्यांनी केलेले हे विधान महत्वाचे आहे.

Protected Content