रावेर प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या ७२ पासून विद्यार्थ्याच्या हितासाठी काम करणारी संघटना आहे. आज स्वतंत्र दिनानिमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रावेर शाखेतर्फे शहरात 73 मीटर तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत विविध महाविद्यालय, शाळा, खाजगी क्लासेस व रावेर मधील विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. रॅलीची सुरवात ही सरदार जी.जी.हायस्कूल, रावेर मधुन करण्यात आली व रावेर शहरातील प्रमुख मार्ग वरून निघुन अंबिका व्यायाम शाळा येथे समारोप करण्यात आला.
यावेळी रावेरचे शहराध्यक्ष युवराज माळी, शहरमंत्री अभिजित लोणारी, प्रमुख वक्ते गितेश चव्हाण तसेच रावेरच्या खासदार रक्षा खडसे, आ.हरिभाऊ जावळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, रावेर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, तहसीलदार उषाराणी देवगुणे, उदोजक श्रीराम पाटील, सुरेश धनके, अमोल पाटील, भास्कर महाजन, शारदा ताई चौधरी, संगीता महाजन, संगीता वाणी, यशवंत दलाल, शिरीष वाणी, गोपाल नेमाडे, विद्याथी परिषदेचे कार्यकर्ते गणेश शिंदे, संजू महाजन, अविनाश पाटील, सागर चौधरी, चेतन महाजन, भूषण महाजन, दिलीप महजन, बॉबी गंगावे, लोकेश महाजन, सनी महाजन, राहुल पाटील, मनीष मानकर, जयेश बिरपन, गौरव चौधरी, गंधर्व, शुभम महाजन, रूषी वरणकर, यश सोनार कुणाल महाजन यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.