जळगाव प्रतिनिधी । काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक उल्हास साबळे यांचे आज पहाटे निधन झाले.
उल्हास साबळे यांनी आज पहाटे साडेपाच वाजता शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उल्हास साबळे हे झुंझार व लढवय्ये नेते म्हणून ओळखले जात असत. तत्कालीन नगरपालिका आणि सध्याच्या महापालिकेतील विविध भ्रष्टाचाराची प्रकरणी त्यांनी चव्हाट्यावर आणली आहेत. त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.