दोन बालिकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशी देण्याची मागणी

chopda news 1

चोपडा प्रतिनिधी । वैजापूर तालुका चोपडा येथील आदिवासी दोन बालिकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या उद्देशाने निवेदन देण्यात आले.

शासकीय विश्रामगृहापासून बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी छात्रसंघ ,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने मोर्चा काढत ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान नादुरकर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजय लोकरे तहसीलदार अनिल गावीत यांना निवेदन देण्यात आले आहे आहेत.

निवेदन देताना ॲड. जामसिंग बारेला, प्रा.जेकराम बारेला, राष्ट्रीय आदिवासी छात्रसंघ दारासिंग पावरा, नामसिंग पावरा, संजय पाडवी, महेंद्र पावरा, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद माजी सभापती गोपाल सोनवणे, समाधान सोनवणे, निलेश भालेराव, दिनेश पावरा, रमुद पाडवी, सागर पावरा, सचिन पावरा, प्रविण पावरा, सुजित बागुल, नाना साळुंखे, परेश पवार आणि सर्व वस्तीगृहातील विद्यार्थिनी मुन्नी पावरा, रेखा पावरा, सूनिता पावरा, आशा पावरा, आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.

आरोपी देवेंद्र मोरे-भोई (वय २२) या नरधामाला ताब्यात घेऊन याला आज अमळनेर येथील सत्र न्यायालयात हजर केले असता सात दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे तसेच या दोघ मुलींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

 

Protected Content