जळगाव (प्रतिनिधी)कामगार नेते धुडकू सपकाळे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यातील हल्लेखोर समाजकंटकांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या संदर्भात अधिक असे की, सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते धुडकू सपकाळे यांच्यासह एकावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला होता. सपकाळे यांच्यावर धारदार शास्त्राने वार झालेले होते. एमआयडीसी हद्दीतील काशिनाथ हॉटेलजवळ पाच जणांनी थेट तलवार व बेस बॉलच्या बॅटच्या सहाय्याने हल्ला चढविला होता. हल्लेखोरांमध्ये कॉमेश रवींद्र सपकाळे, मयूर इंद्रराज सपकाळे, नितीन प्रकाश सोनवणे, मनोज प्रकाश सोनवणे, विजय उर्फ भुऱ्या कमलाकर सपकाळे यांचा समावेश होता.
दरम्यान, हल्लेखोरांना कडक शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते मुकुंद सपकाळे व भरत ससाणे यांच्या नेतृत्वात झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली.