विशाखापट्टणम वृत्तसंस्था । आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये आज दि. 12 ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी 11:30 वाजता समुद्र किनाऱ्याजवळ तटरक्षक दलाच्या एका जहाजाला आग लागली.
याबाबत माहिती अशी की, ऑफशोअर सपोर्ट जहाज कोस्टल जॅग्वारला आग लागताच तटरक्षक दलाने वेगाने बचावकार्य सुरू केले. जहाजामध्ये २९ कर्मचारी होते. सर्वांनी जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र एक जण बेपत्ता असल्याचे कळते आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तटरक्षक दलाच्या एका बेपत्ता जवानाचा शोध अजूनही सुरू आहे. घटनेची चौकशी सुरू आहे.