चाळीसगाव (प्रतिनिधी) युवानेते मंगेश चव्हाण मित्रपरिवारातर्फे श्रावण सोमवारनिमित्त महादेव दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. रांजणगाव येथील मल्हार पेट्रोल पंप येथे मंगेश चव्हाण यांनी शुभेच्छा देऊन या यात्रेस सुरुवात केली.
या यात्रेत 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वर मंदिर, वेरूळ, खुलताबाद भद्रा मारुती, कालीमठ या मार्गाने मार्गक्रमण करून पुन्हा रांजणगाव येथे परत येईल. यावेळी भक्तांना युवानेते मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे फराळाचे वाटप व पाणी बॉटल देण्यात आल्या. याप्रसंगी मंगेश चव्हाण यांनी त्यांच्या घरात असलेल्या धार्मिक वारसा प्रमाणेच या यात्रेचे आयोजन केले असल्याचे सांगितले. याप्रसंगी माजी उपसरपंच रांजणगाव नामदेव पाटील माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटे, सरचिटणीस धनंजय मांडोळे, औ माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, रोहिणी सरपंच अनिल नागरे, डॉक्टर रवींद्र मराठे निवृत्ती भाऊ कवडे शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.