Home क्राईम एकविरा देवीच्या मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली

एकविरा देवीच्या मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली

0
120

ekvira devi mandir chori bamnod

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बामणोद व आमोदा रस्त्यावर असणार्‍या एकविरा देवीच्या मंदिरातील दानपेटी फोडल्याचे आज सकाळी उघडकीस आले.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, बामणोद गावाजवळ आमोदा रस्त्यावर एकविरा देवीचे मंदिर आहे. आज पहाटे या मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडल्याचे भाविकांना आढळून आले. चोरट्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश मिळवून दानपेटीतील रोकड लंपास केल्याचे दिसून आले आहे. याबाबत मंदिराचे विश्‍वस्त रमेश गणपत सोनवणे यांनी फैजपूर पोलीस स्थानकाला माहिती दिली. यावरून पोलीस कर्मचारी जिजाबराव पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार यात दानपेटीत सुमारे ४० ते ४५ हजार रूपये असण्याची शक्यता होती.


Protected Content

Play sound