Home Cities एरंडोल एरंडोलच्या तत्कालीन न.पा. अभियंत्यास माहीती दडविल्याने ७ हजार रुपये दंड

एरंडोलच्या तत्कालीन न.पा. अभियंत्यास माहीती दडविल्याने ७ हजार रुपये दंड

0
26

 

एरंडोल, प्रतिनिधी । येथील नगर पालिकेत कार्यरत तत्कालीन बांधकाम अभियंता पंकज पन्हाळे यांना राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांच्यातर्फे एरंडोल शहरातील दोन नागरिकांनी मागितलेली माहिती न दिल्याने दोन प्रकरणात सात हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, एरंडोल शहरातील रहिवाशी रविंद्र नंदलाल लढे यांनी चावडी समोरील मुतारीची दि.६ नोव्हेंबर १५ रोजी माहिती अधिकारात विचारली होती व ती न दिल्याने ४ हजार रुपये दंड. तसेच शहरतीलच आबा संतोष महाजन यांनी ही दि.१४ सप्टेंबर १६ रोजी नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीनपदासंदर्भात माहिती अधिकारात माहिती विचारली असता ती न दिल्याने ३ हजार रुपये दंड तत्कालीन बांधकाम अभियंता पंकज कैलास पन्हाळे यांना राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांनी सूनवला आहे.


Protected Content

Play sound