डॉ. मनमोहनसिंग राजस्थानमधून राज्यसभेसाठी निवडणूक लढणार

मुंबई (प्रतिनिधी) माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे राजस्थानमधून राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक लढणार आहेत. 13 ऑगस्ट रोजी सिंग हे आपला अर्ज सादर करणार आहेत.

 

डॉ. मनमोहनसिंग हे पंतप्रधान असताना आसाममधून राज्यसभा सदस्य होते. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 14 जून रोजी संपत आहे. त्यामुळे, राज्यसभेत वापसी करण्यासाठी काँग्रेसने त्यांना राजस्थानमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले मदन लाल सैनी यांच्या निधनानंतर येथील जागा रिक्त झालेली आहे. दरम्यान, 26 ऑगस्ट रोजी येथील जागेसाठी निवडणूक होणार असून मतदानानंतर त्याच दिवशी सायंकाळी विजयी उमेदवाराची घोषणा होणार आहे.

Protected Content