
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करत संविधानिक मूल्यांचा जागर करण्यात आला. या सोहळ्यात मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सामूहिक प्रतिज्ञा दिली.
या कार्यक्रमाची सुरुवात जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केल्यानंतर झाली. त्यानंतर त्यांनी सर्व उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून संविधानाप्रती निष्ठा राखण्याची आणि त्यातील तत्त्वांचे पालन करण्याची सामूहिक प्रतिज्ञा दिली.
या प्रसंगी जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे, प्रभारी कार्यकारी अभियंता (प्रशासन) किरण महाजन, प्रणाली विश्लेषक मनोज भराडे तसेच चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीधर भीमनाथ यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सोहळ्यात सहभागी झाले होते.

कार्यक्रमात वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अमित सोनवणे, व्यवस्थापक (मानव संसाधन) तन्वी मोरे, सहायक विधी अधिकारी गणेश चुंचुवार, उपकार्यकारी अभियंता संतोष तडपे, उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) देवेंद्र कासार, सहायक अभियंता किरण पाटील आणि संदीप वराडे यांच्यासह परिमंडल व मंडल कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



