Home धर्म-समाज मुक्ताईनगरात नाथजोगी समाजातर्फे श्री गोरक्षनाथ महाराज प्रकटदिन उत्साहात साजरा 

मुक्ताईनगरात नाथजोगी समाजातर्फे श्री गोरक्षनाथ महाराज प्रकटदिन उत्साहात साजरा 

0
3

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात नाथजोगी समाजाच्या वतीने श्री गोरक्षनाथ महाराज यांचा प्रकटदिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील शासकीय विश्रामगृहात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजबांधवांसह भाविकांनी एकत्र येत गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धापूर्वक अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अखिल भारतीय समाज महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मोतीलाल जोगी यांच्या हस्ते गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित नाथजोगी समाजबांधव आणि भाविकांनीही महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दर्शन घेतले. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. श्री गोरक्षनाथ महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त धार्मिक विधी, पूजाअर्चा, आरती आणि महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यातून नाथ संप्रदायाची समृद्ध परंपरा, आध्यात्मिक विचार आणि गुरु गोरक्षनाथ महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नाथ संप्रदायाची शिकवण ही आध्यात्मिक साधनेसोबतच सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारी आहे. याच विचारांचा जागर करत नाथजोगी समाजबांधवांनी एकत्रितपणे प्रकटदिन साजरा केला. धार्मिक परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्यासोबतच समाजातील ऐक्य अधिक मजबूत करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला पत्रकार तथा जिल्हा संघटक संदीप जोगी, सुरेश जोगी, किशोर जोगी, राजमेश जोगी, गणेश जोगी, अनिल जोगी, राजू जोगी, दत्ता जोगी, विजयनाथ जोगी, भावेश जोगी, राकेश जोगी, चेतन जोगी, मोहित जोगी यांच्यासह नाथजोगी समाजातील अनेक मान्यवर आणि समाजबांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound