Home Cities अमळनेर सोनिया गांधींच्या आत्मचरित्राच्या अवमानाविरोधात अमळनेर काँग्रेस आक्रमक! ; संजय निरुपम यांच्या प्रतिमेचे...

सोनिया गांधींच्या आत्मचरित्राच्या अवमानाविरोधात अमळनेर काँग्रेस आक्रमक! ; संजय निरुपम यांच्या प्रतिमेचे दहन

0
3

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचा अवमान केल्याच्या आरोपावरून अमळनेरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. तसेच संजय निरुपम यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली.

आंदोलनाच्या सुरुवातीला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, शांताराम पाटील, सुलोचना वाघ, मनोज पाटील, भागवत गुरुजी आणि ॲड. रज्जाक शेख यांनी उपस्थितांना संबोधित केले. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचा अवमान झाल्याचा आरोप करत वक्त्यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. राजकीय मतभेद असले तरी व्यक्तीच्या विचारांचा आणि साहित्याचा सन्मान राखला पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या आत्मचरित्रावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पुस्तकाची पाने आणि पोस्टर्स फाडून संजय निरुपम यांनी सोनिया गांधी यांचा अवमान केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित आत्मचरित्रावर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्यातील विविध भागांत उमटत असून अमळनेरमध्येही काँग्रेसने आंदोलनाच्या माध्यमातून आपला निषेध नोंदविला. तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. “सोनिया गांधी यांचा अपमान सहन केला जाणार नाही” आणि “संजय निरुपम यांचा धिक्कार असो” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर संजय निरुपम यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करावा आणि कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

या निषेध आंदोलनात महेश पाटील, गजेंद्र साळुंखे, लोटन चौधरी, प्रताप पाटील, के. व्ही. पाटील, भिकाजी पाटील, अधिकार पाटील, रोहिदास कापडे, शिंदे, कन्हैयालाल कापडे, सुधाकर भैसे, दिलीप पाटील, प्रकाश सोनवणे, ताराचंद सूर्यवंशी आणि आर. जे. पाटील यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Protected Content

Play sound