Home Cities जळगाव चेक बाऊन्सचे वाद मिटवून ४७ लाखांची वसुली; जळगावच्या विशेष लोकअदालतीची उल्लेखनीय कामगिरी

चेक बाऊन्सचे वाद मिटवून ४७ लाखांची वसुली; जळगावच्या विशेष लोकअदालतीची उल्लेखनीय कामगिरी

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांच्या पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या विशेष लोकअदालतीमध्ये धनादेश अनादर (चेक बाऊन्स) संदर्भातील २८ प्रलंबित प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात यश आले आहे. या प्रकरणांच्या माध्यमातून तब्बल ४७ लाख ५ हजार ९५५ रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात या विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

न्यायालयात दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली धनादेश अनादराची प्रकरणे सामंजस्याने मिटवून पक्षकारांना जलद न्याय मिळावा, हा या विशेष लोकअदालतीचा मुख्य उद्देश होता. या लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील विविध न्यायालयांमधील प्रलंबित असलेली एकूण १,४२७ प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती.

न्यायाधीश वृंद, वकील वर्ग, न्यायालयीन कर्मचारी तसेच संबंधित पक्षकार, बँका आणि वित्तीय संस्थांच्या सक्रिय सहभागातून या प्रकरणांवर चर्चा घडून आली. या प्रयत्नांमधून २८ प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड होऊन ती निकाली निघाली आणि त्यातून ४७,०५,९५५ रुपयांची वसुली झाली.

जळगाव जिल्हा व सर्व तालुका न्यायालयांमध्ये झालेल्या विशेष लोकअदालतीत ठेवण्यात आलेल्या १,४२७ प्रलंबित चेक बाऊन्स प्रकरणांपैकी २८ प्रकरणे निकाली काढत ४७ लाख ५ हजार ९५५ रुपयांची यशस्वी वसुली करण्यात आली.


Protected Content

Play sound