Home धर्म-समाज राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त वडजी येथे पत्रकारांचा गौरव; सन्मान सोहळा उत्साहात

राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त वडजी येथे पत्रकारांचा गौरव; सन्मान सोहळा उत्साहात

0
3

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  राष्ट्रीय पत्रकारिता दिनाचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने भडगाव तालुक्यातील वडजी उपकेंद्रात पत्रकार सन्मान सोहळा २०२६ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पत्रकारिता क्षेत्रात अहोरात्र उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आणि समाजातील वास्तव समोर आणणाऱ्या पत्रकार बंधू-भगिनींचा यावेळी विशेष सन्मान करून त्यांच्या कष्टाची व कार्याची दखल घेण्यात आली.

पत्रकारिता हा लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा चौथा स्तंभ मानला जातो. जनसामान्यांचे प्रश्न, सामाजिक समस्या, वास्तव परिस्थिती तसेच समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार मंडळी करीत असतात. अशा समाजघटकांच्या पाठीशी उभे राहत त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यात्म आणि पत्रकारिता यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या प्रांगणात ब्रह्माकुमारी मनीषा दीदीजी (संचालिका, भडगाव) यांच्या हस्ते उपस्थित पत्रकारांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहिताचे व राष्ट्रहिताचे कार्य करणाऱ्या पत्रकारांचे योगदान अमूल्य आहे. समाजात शांतता, बंधुभाव, उच्च मूल्ये आणि सकारात्मक विचारांची जपणूक करण्यासाठी पत्रकारांची भूमिका नेहमीच मार्गदर्शक ठरत असते.
या प्रेरणादायी सोहळ्याला महाराष्ट्र पत्रकार संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार तसेच भडगाव तालुकाध्यक्ष जावेद शेख यांच्यासह परिसरातील अनेक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकारांनी ब्रह्माकुमारी परिवाराच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल तीव्र समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुंदर आयोजन व सूत्रसंचालन वडजी उपकेंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी चेतना दीदी यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी रवींद्र पाटील, भूषण पाटील, किसन पाटील, सुरेश वाघ, एकनाथ नेरपगार, संजय नेरपगार, पांडुरंग पाटील, गुलाब पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सोमनाथ शिंपी, छोटू पाटील, भीमसिंग राजपूत, चेतन पाटील यांच्यासह समस्त शिवबाबा भक्त परिवाराने विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound