Home क्राईम मुक्ताईनगर बनले अवैध गुटखा व्यापाराचे केंद्र? कोट्यवधींच्या उलाढालीचा संशय!

मुक्ताईनगर बनले अवैध गुटखा व्यापाराचे केंद्र? कोट्यवधींच्या उलाढालीचा संशय!

0
मुक्ताईनगर बनले अवैध गुटखा व्यापाराचे केंद्र? कोट्यवधींच्या उलाढालीचा संशय!

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुका विमल गुटखा आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या कथित अवैध व्यापारामुळे चर्चेत आला आहे. येथून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याची चर्चा असून, दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

यापूर्वीही गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, वाहनांवर कारवाई करून हा अवैध व्यवसाय थांबणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मालाचा पुरवठा कुठून होतो, साठवणूक कुठे केली जाते आणि राज्यभर वितरणाचे जाळे कोण चालवते, याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे.

प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक आणि विक्री सुरू असल्याच्या चर्चांमुळे अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित यंत्रणांना या व्यवहाराची माहिती आहे का? असल्यास मुख्य पुरवठादारांवर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता या कथित व्यापाराच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचून संपूर्ण पुरवठा साखळी उघड करण्याची मागणी होत आहे. मुक्ताईनगरमधील गुटखा व्यापाराचे नेमके स्वरूप काय आणि या व्यवहारामागे कोण आहे, हे सखोल चौकशीतूनच स्पष्ट होणार आहे.