पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात सक्रिय असलेले श्री भवानी गड संस्थानचे अध्यक्ष मोहित तांबे यांनी आपल्या असंख्य युवा समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शहरातील पंकज बँक्वेट हॉल येथे आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या हस्ते मोहित तांबे यांना शिवबंधन बांधून पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर पारोळा युवासेना शहरप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्या प्रवेशामुळे शहरातील युवासेनेला नवे नेतृत्व मिळाले आहे.
आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत मोहित तांबे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रवेशासोबतच मोठा महादेव चौक, मडक्या मारोती चौक, साईबाबा नगर यांसह शहरातील विविध भागांतील अनेक युवकांनीही शिवसेनेचे शिवबंधन बांधले. यावेळी पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या युवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पक्षप्रवेश सोहळ्यात मार्गदर्शन करताना आमदार अमोल पाटील यांनी पारोळा, एरंडोल आणि भडगाव या तिन्ही तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. युवकांनी केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता सामाजिक कार्य, रोजगार, शिक्षण, क्रीडा तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. संघटनेतील पद हे केवळ सन्मानाचे नसून जनसेवेची मोठी जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी शेतकी संघाचे संचालक स्व. सुधाकरअण्णा पाटील यांच्या अपघाती निधनाबद्दल उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली.
मोहित तांबे यांच्या सामाजिक कार्याची, युवकांमधील असलेल्या संपर्काची आणि संघटनात्मक क्षमतेची दखल घेत त्यांच्यावर युवासेना शहरप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली पारोळा शहरात युवासेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नव्या जबाबदारीच्या माध्यमातून युवकांना संघटित करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची अपेक्षाही व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी कृषी सभापती डॉ. दिनकर पाटील, माजी नगराध्यक्ष दयारामअण्णा पाटील, मधुकर पाटील, अमृत चौधरी, मनिष पाटील, प्रशांत पाटील, पंकज मराठे आणि नितीन सोनार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पक्षप्रवेश सोहळ्यात रविंद्र खाडे, अंकित परदेशी, अक्षय पाटील, रोहित पाटील, अजय पाटील, मयूर पाटील, समाधान महाजन, सचिन पाटील, राज महाजन, दर्शन पाटील, भूपेश, अनिल मराठे, प्रमोद महाजन, मंगेश पाटील, स्वप्निल महाजन, सूरज पाटील, सोनू महाजन, मुन्ना पाटील, विवेक मराठे, राकेश शिंदे, मयूर मडके, गणेश बागडे, मुकेश भोसले, बंटी चौधरी, भरत पाटील, आकाश पाटील, वैभव चौधरी, प्रतिक पाटील आणि कुणाल मोरे यांच्यासह अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीलजी भालेराव यांनी केले. मोहित तांबे यांच्या नियुक्तीमुळे पारोळा शहरातील युवासेनेला नवे नेतृत्व मिळाले असून, युवकांच्या संघटनात्मक बांधणीसह सामाजिक कार्याला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



