जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छावा मराठा युवा महासंघाच्या जळगाव महानगर महिला आघाडीच्या महानगराध्यक्षपदी विद्या सुभाष झनके यांची हायकून निवड करण्यात आली आहे. महिला वर्गाला संघटित करणे, त्यांना सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग मिळवून देणे या उद्देशाने ही नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यात संघटनेचे संघटन अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
विद्या झनके या भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा सचिव तसेच केंद्रीय शिक्षिका म्हणून कार्यरत असून, त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून छावा मराठा युवा महासंघाच्या महानगर उपाध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत निष्ठापूर्वक सांभाळली आहे. त्यांच्या याच उत्तुंग संघटनात्मक अनुभवाची व कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर जळगाव महानगर महिला आघाडीच्या महानगराध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी नियुक्तीविषयीचे सर्वाधिकार प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे यांना प्रदान केले होते. त्यानुसार अमोल कोल्हे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या घोषणेनुसार जाहीर करण्यात आलेल्या नवीन कार्यकारिणीमध्ये महानगर उपाध्यक्षपदी ममता जावळे, संध्या तायडे, जयश्री सोनवणे व शारदा तायडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच महानगर सचिव पदाची धुरा सपना कोळी, वैशाली ठाकूर आणि ज्योती सिंगनाथ यांच्याकडे सोपविण्यात आली असून, सहसचिवपदी उज्ज्वला सपकाळे, रूपा पाटील व ज्योती खरे यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय महानगर कार्यकारिणी सदस्य म्हणून योगिता सुतार, ऊषा इंगळे, प्रमिला इंगळे, आरती सकट, मीनाक्षी खैरनार व विजया राऊत यांचा समावेश करण्यात आला आहे, तर कायदेविषयक सल्लागार म्हणून ॲड. वनिता शिंपी या जबाबदारी पार पाडणार आहेत.
महिला संघटन अधिक सक्षम करणे, महिलाঁना विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर ठेवणे आणि त्यांच्या हक्कासाठी लढा देणे या प्रमुख अजेंड्यावर ही नवीन कार्यकारिणी काम करणार आहे. महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना योग्य मंच मिळवून देण्यासाठी ही टीम प्रभावीपणे कार्यरत राहील, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, प्रदेशाध्यक्ष संजय जाधव, प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्यासह संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील उज्ज्वल सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.



