
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक जाहीर होताच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार २६ ते ३० ऑक्टोबरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होईल, तर ३ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३ ते १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १८ नोव्हेंबर रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल.
२९ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, ३० नोव्हेंबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आता जिल्हा बँकेवरील वर्चस्वासाठी कोणते गट आणि दिग्गज मैदानात उतरतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.



