Home क्राईम यावलमध्ये विसर्जन मिरवणुकीचे वाद्य बंद केल्याच्या रागातून भाजपच्या महिला नगरसेविकेचा विनयभंग ;...

यावलमध्ये विसर्जन मिरवणुकीचे वाद्य बंद केल्याच्या रागातून भाजपच्या महिला नगरसेविकेचा विनयभंग ; मारहाण प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा

0
12


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात दुर्गोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान रात्री दहा वाजता वाद्ये बंद केल्याच्या रागातून भाजपच्या महिला नगरसेविकेच्या घरी जाऊन शिवीगाळ, मारहाण आणि विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी घनश्याम दिलीप पाटील (रा. बोरावल गेट परिसर, यावल) याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री यावल शहरात विविध दुर्गोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. विसर्जन मिरवणुकांमधील वाद्ये वाजविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार रात्री दहा वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली होती. या संदर्भात पोलीस प्रशासनानेही शहरातील सर्व दुर्गोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रात्री दहा वाजता शहरातील मिरवणुकांमधील वाद्ये बंद करण्यात आली.

मात्र, वाद्ये बंद केल्याच्या कारणावरून घनश्याम पाटील याने भाजप आमदारांच्या नावाचा उल्लेख करत सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तो भाजपच्या एका महिला नगरसेविकेच्या घरी गेला आणि घराबाहेर उभे राहून मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी त्याने भाजपच्या नगरसेवकांनाही उद्देशून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.घराबाहेरील आरडाओरड आणि शिवीगाळ ऐकून संबंधित महिला नगरसेविका आणि त्यांचे पती घराबाहेर आले. त्यांनी संबंधित व्यक्तीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर त्याने महिला नगरसेविकेच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच महिला नगरसेविकेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केल्याची तक्रारही देण्यात आली आहे.

या घटनेनंतर संबंधित महिला नगरसेविकेने यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार घनश्याम दिलीप पाटील याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दुर्गोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत वाद्ये बंद करण्याच्या वेळेवरून सुरू झालेला वाद थेट लोकप्रतिनिधीच्या घरापर्यंत पोहोचल्याने या घटनेची चर्चा होत आहे.यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे आणि पोलीस कर्मचारी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. तपासादरम्यान घटनेची पार्श्वभूमी आणि तक्रारीतील आरोपांबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound