Home Cities पारोळा पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ३० वर्षीय तरुणाने केले असे काही !

पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ३० वर्षीय तरुणाने केले असे काही !

0
1

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील शिवरे येथे प्रविण रमेश पाटील (वय ३०) या तरुणाचा गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली. त्याला पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रविण पाटील हा शिवरे येथे आपल्या आजीसोबत राहत होता. तो मजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाइकांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्याला खाली उतरवून रुग्णालयात नेले. मात्र, रात्री साडेनऊच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी प्रदीप शिवाजी पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यू क्रमांक ११६/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार सुनील कौतिक हाटकर पुढील तपास करीत आहेत. तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


Protected Content

Play sound