Home क्राईम इन्स्टाग्राम खाते बंद व डेटा गहाळ; चौकशी करून कारवाई करा : वैशाली...

इन्स्टाग्राम खाते बंद व डेटा गहाळ; चौकशी करून कारवाई करा : वैशाली झाल्टे यांची मागणी

0
3

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सामाजिक कार्यकर्त्या वैशाली रोहिदास झाल्टे यांनी आपले इन्स्टाग्राम खाते अज्ञात व्यक्तीने बंद केल्याची तसेच खात्यावरील डेटा गहाळ झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली आहे.

वैशाली झाल्टे या ‘अभेद्या फाउंडेशन’, ‘शिक्षण घर’ आणि ‘गुलाबी गँग सखी’च्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभागी असतात. दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरात सिग्नलजवळ वाहतूक कोंडी झालेली असताना एक महिला पोलीस पोलीस कर्मचारी ह्या मोबाईलवर बोलत होत्या त्यांना मोबाईल वापराबाबत त्यांनी व्हिडिओ चित्रीकरण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेनंतर झालेल्या वादासंदर्भात त्या जळगाव वाहतूक शाखेच्या कार्यालयात गेल्या होत्या. तेथे पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर प्रसारित केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. संबंधित व्हिडिओमध्ये पोलीस मोनिका कळसकर व सामाजिक कार्यकर्त्या यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, संबंधित व्हिडिओच्या संदर्भात सोशल मीडियावरून टिप्पणी आल्याचे आणि त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११.१७ वाजता आपले इन्स्टाग्राम खाते सुरक्षिततेच्या कारणास्तव लॉक झाल्याचा संदेश मिळाल्याचे झाल्टे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यांचे खाते कोणी बंद केले, खाते बंद होण्यामागील नेमके कारण काय आणि खात्यावरील डेटा गहाळ झाला आहे का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, प्रकरणातील तांत्रिक बाबींची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सोशल मीडियावरील खाते बंद होण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने, तपासातूनच याबाबतचे सत्य समोर येऊ शकेल.


Protected Content

Play sound