Home क्राईम जळगावात ६४ ग्रॅम एमडी ड्रग्जसह अट्टल गुन्हेगार जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगावात ६४ ग्रॅम एमडी ड्रग्जसह अट्टल गुन्हेगार जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्रीविरोधात राबवल्या जात असलेल्या ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने धडक कारवाई करत ६४.४४ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थासह एका सराईत गुन्हेगाराला रंगेहात ताब्यात घेतले आहे. १ ऑक्टोबर रोजी दुपारी कचरा फॅक्टरी परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण २ लाख १३ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, जळगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील पालधी-तरसोद बायपासलगत असलेल्या कचरा फॅक्टरी परिसरात अजय अजय बिरजू गांघे (रा. तांबापुरा कंजरवाडा, मेहरुण, जळगाव) हा एमडी ड्रग्ज विक्रीसाठी बाळगून आहे. मिळालेल्या माहितीची खात्री करून पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ लाख ९३ हजार ३२० रुपये किमतीचे ६४.४४ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि २० हजार रुपयांचा मोबाईल फोन असा एकूण २,१३,३२० रुपयांचा ऐवज आढळून आला.

याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २९५/२०२६ नुसार एनडीपीएस कायद्याचे कलम ८(क), २२(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ताब्यात घेण्यात आलेल्या अजय गांघे याच्याविरुद्ध यापूर्वी एमडी ड्रग्ज, गांजा बाळगणे व विक्री करणे तसेच घरफोडी यांसारखे एकूण ३५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात त्याच्याशी संबंधित असलेल्या आणखी दोन संशयित व साक्षीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक शंतनू पाटील, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, विजय देवराम पाटील यांच्यासह अंमलदार अक्रम शेख, किशोर पाटील, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, रवींद्र कापडणे, गोपाळ पाटील, प्रदिप सपकाळे, राहुल रगडे, छगन तायडे आणि तांत्रिक मदतीतील मिलींद जाधव, गौरव पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


Protected Content

Play sound