Home आरोग्य डॉ. केतकी पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये ५ किमी वॉकथॉन ; ‘प्रत्येक ठोका महत्त्वाचा,...

डॉ. केतकी पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये ५ किमी वॉकथॉन ; ‘प्रत्येक ठोका महत्त्वाचा, प्रत्येक पाऊल मोलाचे’चा संदेश

0
10

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे ‘प्रत्येक ठोका महत्त्वाचा, प्रत्येक पाऊल मोलाचे’ या संकल्पनेवर आधारित जनजागृतीपर ५ किलोमीटर वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले. हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाला नर्सिंगचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले. तसेच हृदयविकारासंदर्भात केवळ स्वतःपुरती काळजी न घेता समाजामध्येही आरोग्यविषयक जनजागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ५ किलोमीटर वॉकथॉनमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि इतर सहभागी उत्साहाने सहभागी झाले. चालण्यासारख्या नियमित शारीरिक हालचालींचा आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम यामधून अधोरेखित करण्यात आला. नियमित चालणे व व्यायामासोबत संतुलित आहार घेणे, ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन करणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे या सवयी आरोग्यदायी जीवनशैलीसाठी महत्त्वाच्या असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. वॉकथॉनसोबतच विद्यार्थ्यांसाठी रील स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. हृदयाचे आरोग्य, निरोगी जीवनशैली, नियमित शारीरिक व्यायाम, संतुलित आहार आणि हृदयविकार प्रतिबंध या विषयांवर विद्यार्थ्यांनी सर्जनशील रील्स तयार केल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोग्यविषयक संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून करण्यात आला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षणासोबतच सामाजिक सहभाग आणि सर्जनशील जनजागृतीचा अनुभव मिळाला. नर्सिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी भविष्यात आरोग्यसेवा देताना केवळ उपचारात्मक भूमिकाच नव्हे, तर प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक जनजागृतीमध्येही योगदान द्यावे, या उद्देशाला या उपक्रमातून चालना मिळाली. हृदयविकार प्रतिबंध, नियमित व्यायाम, शारीरिक सक्रियता आणि आरोग्यदायी सवयींबाबत विद्यार्थी तसेच समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. ‘प्रत्येक ठोका महत्त्वाचा, प्रत्येक पाऊल मोलाचे’ हा संदेश देत सहभागीांनी निरोगी हृदय आणि निरोगी जीवनाचा संकल्प केला. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.


Protected Content

Play sound