Home क्राईम जळगाव येथून ४३ वर्षीय व्यक्ती बेपत्ता; शोध घेण्यासाठी नातेवाईकांचे नागरिकांना आवाहन

जळगाव येथून ४३ वर्षीय व्यक्ती बेपत्ता; शोध घेण्यासाठी नातेवाईकांचे नागरिकांना आवाहन

0
1


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील जुने जळगाव भागातील बदाम गल्ली येथून ४३ वर्षीय दीपक अशोक काळे हे पहाटे तीन वाजता अचानक घरातून निघून गेले असून ते बेपत्ता झाले आहेत. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी चिंता व्यक्त केली असून नागरिकांनी त्यांना शोधण्यासाठी मदत करावी, असे आवाहन केले आहे.

बेपत्ता झालेले दीपक अशोक काळे यांचे वय ४३ वर्षे असून त्यांची उंची अंदाजे ५.७ फूट आहे. त्यांचा रंग सावळा, बांधा मध्यम, केस थोडे विस्कटलेले व काळे आहेत, तसेच हनुवटीपर्यंत हलकी दाढी आहे. ते मानसिकदृष्ट्या आजारी (मेंटली डिस्टर्ब) असून त्यांना अधूनमधून झटके येतात किंवा ते अचानक अस्थिर होतात. या मानसिक स्थितीमुळे ते कधीही अचानक रागावू शकतात, कधी गोंधळून जाऊन योग्य उत्तर देत नाहीत आणि स्वतःची काळजी घेण्यास सक्षम नाहीत.

त्यामुळे ते कुठेही आढळल्यास घाबरून न जाता शांतपणे त्यांच्या जवळ जावे आणि त्वरित त्यांच्या कुटुंबाशी अथवा दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात आली आहे. दीपक काळे यांच्याविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास संजय भंगाळे ९९२२४७१८१० या मोबाईल क्रमांकांवर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound