Home धर्म-समाज अडीचशे वर्षांची परंपरा जपत येवतीत वग्दी सण उत्साहात; पावसाने आनंदाला उधाण

अडीचशे वर्षांची परंपरा जपत येवतीत वग्दी सण उत्साहात; पावसाने आनंदाला उधाण

0
15


बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येवतीचे ग्रामदैवत श्री बहिरोबा महाराज यांच्यावर परिसरातील भाविकांची अगाध श्रद्धा आहे. वग्दीचा आशीर्वाद घेतल्यास संततीप्राप्ती होते, अशी धारणा असल्यामुळे सकाळपासूनच मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात मानाची मिरवणूक
सायंकाळच्या सुमारास मानकऱ्यांनी संबळ, भारूड, गोंधळ, कीर्तन आणि डफाच्या तालावर मानाच्या बैलगाडीची गावातून भव्य प्रदक्षिणा काढली. *”बहिरोबा महाराज की जय”* च्या गजराने आणि गुलालाच्या उधळणीने संपूर्ण येवती परिसर चैतन्यमय झाला होता. मिरवणुकीनंतर मानाच्या बैलगाडीची विधिवत पूजा करण्यात आली.

विश्वनाथ धनगर यांना यंदाचा वग्दीचा मान
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी वग्दीची मिरवणूक काढण्याची प्रथा असून, यासाठी सात दिवस आधीपासूनच गावात पूर्वतयारी केली जाते. यंदा वग्दीचा मान विश्वनाथ धनगर यांना मिळाला. पोळ्याच्या दिवसापासून वग्दी निरंकार उपवास धरतात आणि त्यानंतर या मुख्य सोहळ्यास प्रारंभ होतो.

अशी आहे वग्दीची अनोखी पद्धत

बैलगाडी सजवून त्यात तराजूच्या काट्यासारखी एक मोठी काठी बांधली जाते.
काठीच्या एका बाजूला वग्दी (व्यक्ती) आणि दुसऱ्या बाजूला त्याच वजनाची वाळू बांधली जाते.
ही रचना गोल फिरवत गावातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जाते.

ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य
या सोहळ्यासाठी कृउबा समिती संचालक रामदास पाटील, माजी सरपंच पुरुषोत्तम पाटील यांच्यासह रामदास श्रावणे, विठ्ठल जंगले, गजानन सावरीपगार, संजय जंगले, राजाराम जंगले, ज्ञानेश्वर जंगले, अशोक सावरीपगार, सिताराम वाघ, आत्माराम काटकर, निवृत्ती वाघ, दत्तू धनगर, शांताराम धनगर, विनोद विसाळे, राजू शिंदे, नारायण ठाकूर, बबलू ठाकूर, संतोष पाटील, विकास शिंदे, जितेंद्र ठाकूर, वासुदेव काटकर, प्रल्हाद वाघ, राजू सावरीपगार, डॉ. आनंद माळी, युवराज कांदेले, विनोद शिंदे, गजानन कुंभार, पवन भाकरे व विजय ठाकूर यांच्यासह सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.


Protected Content

Play sound