Home Cities अमळनेर पाडसे-एकलहरे शिव रस्त्यावर वाळूची अनधिकृत वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; महसूल पथकाची...

पाडसे-एकलहरे शिव रस्त्यावर वाळूची अनधिकृत वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; महसूल पथकाची कारवाई

0
16


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मौजे पाडसे-एकलहरे शिव रस्त्यावर अनधिकृतरीत्या गौण खनिज वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडले. उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग  मयुर भंगाळे तसेच तहसीलदार अमळनेर श्रीमती उमा ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पकडण्यात आलेले ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

पाडसे-एकलहरे शिव रस्त्यावर महसूल विभागाचे पथक पाहणी व गस्त घालत असताना एक ट्रॅक्टर अनधिकृतपणे वाळूची वाहतूक करताना आढळून आले. पथकाने तत्काळ कारवाई करत संबंधित ट्रॅक्टर ताब्यात घेतले. वाळू वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी तसेच संबंधित कागदपत्रांबाबत तपासणी करण्यात आल्यानंतर वाहन पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.

गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभागाकडून वेळोवेळी तपासणी आणि गस्त घालण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाडसे-एकलहरे शिव रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. अनधिकृत वाळू वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने अशा प्रकारच्या वाहतुकीवर प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे.

ही कारवाई उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे आणि तहसीलदार उमा ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई करणाऱ्या पथकात शहापूरचे ग्राम महसूल अधिकारी विक्रम कदम, ब्राह्मणेचे ग्राम महसूल अधिकारी विकेश भोई, बोहरा येथील ग्राम महसूल अधिकारी भूषण पाटील, पाडसेचे ग्राम महसूल अधिकारी मुकेश देसले आणि डांगर बु. येथील ग्राम महसूल अधिकारी दीपक पाटील यांचा समावेश होता.


Protected Content

Play sound