Home Cities जळगाव जळगावात ‘बहिणाई ब्रिगेड’ आणि ‘युवक महासंघा’तर्फे बहिणाबाई चौधरी यांची जयंती साजरी

जळगावात ‘बहिणाई ब्रिगेड’ आणि ‘युवक महासंघा’तर्फे बहिणाबाई चौधरी यांची जयंती साजरी

0
9


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ आणि बहिणाई ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने बहिणाबाई उद्यान येथे अत्यंत उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस व पुतळ्याला अभिवादन करून झाली. शहराच्या प्रथम महापौर आणि बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा आशा कोल्हे यांनी पुतळ्याचे पूजन केले, तर माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर उपस्थितांनी बहिणाबाईंच्या अजरामर जीवनमूल्यांचे व त्यांच्या साहित्याचे स्मरण केले.
कार्यक्रमात काव्यवाचन आणि वैचारिक मार्गदर्शनाचा सुरेख संगम पाहायला मिळाला. कवी डॉ. प्रा. संध्या महाजन, कवी डॉ. प्रा. वंदना नेमाडे आणि बहिणाई ब्रिगेडच्या महानगराध्यक्षा वैशाली झोपे यांनी बहिणाबाईंच्या प्रसिद्ध कवितांचे बहारदार वाचन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. बहिणाई ब्रिगेडच्या पूर्व जिल्हाध्यक्षा स्वाती भोळे यांनी बहिणाबाईंच्या विचारांचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले, तर अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे अध्यक्ष ॲड. प्रकाशराव पाटील यांनी बहिणाबाईंच्या जीवनपटावर सविस्तर प्रकाश टाकला.
या प्रसंगी समाज युवा नेते ललित चौधरी, महामंडळाचे अध्यक्ष मधुकर भंगाळे, सुरेश फालक आणि राहुल भारंबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा हर्षा बोरोले, भुसावळ महानगराध्यक्षा मनीषा पाटील, अंजली नारखेडे, अनिता पाटील व रेणुका झांबरे यांनी केले. लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप (बंडू) भोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Protected Content

Play sound