Home Cities जळगाव अविनाशी सेवा पुरस्कारांची घोषणा

अविनाशी सेवा पुरस्कारांची घोषणा

0
35

जळगाव प्रतिनिधी । यंदा अविनाशी पुरस्कार औरंगाबाद येथील साकार संस्था व बीड जिल्ह्यातील गेवराई येथील संतोष गर्जे यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांनी पत्रपरिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस केशवस्मृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष भरत अमळकर, जळगाव जनता बँकेचे सीईओ पुंडलिक पाटील, केशवस्मृतीचे सचिव रत्नाकर पाटील उपस्थित होते. येथील केशवस्मृती सेवासंस्था व जळगाव जनता बँकेतर्फे अविनाशी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.डॉ. अविनाश आचार्य यांच्या नावाने दरवर्षी अविनाशी सेवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. यात यंदा निवड झालेली साकार संस्था ही जन्मत: टाकून दिलेल्या अनाथ बालकांचे संगोपन करते. तर संतोष गर्जे हे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बालग्राम या संस्थेच्या माध्यमातून काम करत आहेत. या पुरस्कारांचे वितरण ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संभाजी राजे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भैय्या जोशी व प्रसिद्ध उद्योजक पुखराज पगारिया उपस्थित राहणार आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound