Home धर्म-समाज पारोळ्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

पारोळ्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

0
16

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक आदिवासी दिनानिमित्त पारोळा तालुक्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि सामाजिक न्यायासाठी संघर्ष करणारे क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला समाजबांधवांची मोठी उपस्थिती लाभली.

रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात पारोळा तालुकाध्यक्ष पिंटू ठाकूर यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर पिंटू भाऊ ठाकूर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित समाजबांधवांनीही भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली.

भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी दिलेला लढा आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. त्यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेत आदिवासी समाजाने आपली संस्कृती, परंपरा आणि सामाजिक ओळख जपण्यासोबतच शिक्षण, रोजगार आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान आदिवासी समाजाची एकजूट अधिक मजबूत करण्यावरही भर देण्यात आला. समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, नव्या पिढीला आपल्या इतिहासाची व संस्कृतीची ओळख करून देणे आणि समाजाच्या प्रगतीसाठी सकारात्मक उपक्रम राबविण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास उपाध्यक्ष ईश्वर ठाकूर (बाबा), सचिव जितेंद्र खंडू ठाकूर, कोषाध्यक्ष किशोर उत्तम ठाकूर, सरचिटणीस प्रवीण सोमा ठाकूर, माजी अध्यक्ष सुनील वसंत ठाकूर, बाबुलाल ठाकूर, रघुनाथ ठाकूर, छोटू ठाकूर, गोपाल ठाकूर, मयूर ठाकूर, शुभम संतोष ठाकूर, शुभम छोटू ठाकूर, कृष्णा ठाकूर यांच्यासह समाजबांधव आणि बाळ-गोपाळ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना उपस्थितांनी आदिवासी समाजाची एकता, संस्कृतीचे संवर्धन, परंपरांचे जतन आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. उत्साहपूर्ण व एकजुटीच्या वातावरणात जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.


Protected Content

Play sound