Home आरोग्य रक्षाबंधनानिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

रक्षाबंधनानिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

0
12

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रक्षाबंधन सणानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मादाय रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ३० ऑगस्टपर्यंत रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार असून विविध आजारांची तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

डॉ. युवराज बढे यांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह, हृदयरोग, फुप्फुस व किडनी विकारांसह विविध आजारांवर तपासणी व उपचार केले जाणार आहेत. तसेच डॉ. रोशन राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिसिन विभागातील रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. ताप, सर्दी, खोकला, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, थायरॉईड, किडनी व लिव्हरचे आजार, श्वसनविकार, दमा, क्षयरोग (टीबी) यासह विविध आजारांसाठी नागरिकांना या शिबिराचा लाभ घेता येणार आहे.

रुग्णांच्या गरजेनुसार डायलिसिस, ब्राँकोस्कोपी, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी आणि २ डी इको कार्डिओग्राफी यांसारख्या आवश्यक वैद्यकीय तपासण्या व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच ऑक्सिजन, नेब्युलायझेशन, आयसीयू, व्हेंटिलेटर आणि रुग्णवाहिका यांसारख्या सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी २४ तास तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे.

शासनाच्या विविध आरोग्य योजनांमध्ये समाविष्ट नसलेल्या आजारांवरही शिबिराच्या कालावधीत सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तसेच आवश्यक वैद्यकीय तपासण्या, शस्त्रक्रिया आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांनी शिबिराला येताना आयुष्मान कार्ड सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आयुष्मान कार्ड उपलब्ध नसल्यास मूळ रेशन कार्ड आणि आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. त्यामुळे पात्र रुग्णांना योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.

दरम्यान, ग्रामीण व शहरी भागातील गरजू नागरिकांना विविध आजारांची वेळेवर तपासणी व उपचार मिळावेत, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. उल्हास पाटील रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

रक्षाबंधनानिमित्त आयोजित ‘भव्य आरोग्य संपदा शिबिरा’त ३० ऑगस्टपर्यंत विविध आजारांची तपासणी, उपचार, विशेष वैद्यकीय सुविधा आणि सवलती उपलब्ध राहणार आहेत. गरजू रुग्णांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिराचा लाभ घ्यावा.

 


Protected Content

Play sound