Home आरोग्य गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांनी साजरा आंतरराष्ट्रीय योग दिन 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांनी साजरा आंतरराष्ट्रीय योग दिन 

0
19


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. ‘योगा फॉर हेल्दी एजिंग’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमातून शिक्षक व कर्मचाऱ्यांना निरोगी जीवनशैलीसाठी योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

महाविद्यालयाच्या योगा हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे, योगशिक्षक डॉ. अतुल बर्‍हाटे, सर्व विभागप्रमुख तसेच प्राध्यापकवर्ग उपस्थित होता. यावेळी उपस्थितांनी उत्साहाने योग प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला.

योगशिक्षक डॉ. अतुल बर्‍हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील प्राध्यापकवृंदांनी विविध योगासने आणि प्राणायाम केले. यामध्ये ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, बद्धकोणासन, वज्रासन, मंडुकासन, त्रिकोणासन, शवासन आदी योगासनांचा समावेश होता. तसेच कपालभाती, अनुलोम-विलोम आणि भ्रामरी या प्राणायामाचेही प्रात्यक्षिक घेण्यात आले. योगासने आणि प्राणायामामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते, मानसिक ताण कमी होतो आणि आरोग्य संतुलित राहण्यास मदत होते, याबाबत डॉ. अतुल बर्‍हाटे यांनी मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यास हा निरोगी आणि आनंदी जीवनासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमाचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष उल्हास पाटील, सचिव वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील आणि डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) यांनी कौतुक केले. त्यांनी महाविद्यालयाने राबविलेल्या या आरोग्यविषयक उपक्रमाचे अभिनंदन केले.  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. योगाच्या माध्यमातून आरोग्य, सकारात्मकता आणि शारीरिक-मानसिक संतुलनाचा संदेश देण्यात आला.


Protected Content

Play sound