Home Cities भुसावळ दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील रोजगार नोंदींवर प्रश्नचिन्ह; शमिभा पाटील यांनी केली चौकशीची...

दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील रोजगार नोंदींवर प्रश्नचिन्ह; शमिभा पाटील यांनी केली चौकशीची मागणी

0
20


दीपनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील रोजगार व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, काही कंपन्या व लेबर कंत्राटदारांकडून कामगारांच्या नोंदींमध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकल्पबाधित आणि स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, तसेच संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील यांनी केली आहे.

दीपनगर प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्यात आली असून, अनेक गावांतील नागरिक या प्रकल्पामुळे प्रभावित झाले आहेत. स्थानिक युवकांना रोजगार देण्याची आश्वासने देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात स्थानिकांना अपेक्षित रोजगार मिळत नसल्याची नाराजी प्रकल्पग्रस्तांमध्ये आहे.

काही कंत्राटदारांकडून प्रत्यक्ष कामावर असलेल्या कामगारांची संख्या आणि कागदोपत्री दाखविण्यात येणारी संख्या यामध्ये तफावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “कामावर कमी आणि कागदावर पूर्ण कामगार” या प्रकारामुळे कामगारांचे PF, ESI, वेतन नोंदी आणि इतर सुविधांमध्ये अनियमितता होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी सर्व कंत्राटी व कायम कामगारांची चौकशी करावी, रोजगार नोंदींचे सामाजिक लेखापरीक्षण करावे, प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक युवकांसाठी स्वतंत्र रोजगार धोरण लागू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या कंपन्या, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound