Home Cities अमळनेर अमळनेरात श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनचे जिल्हास्तरीय अधिवेशन उत्साहात

अमळनेरात श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनचे जिल्हास्तरीय अधिवेशन उत्साहात

0
6


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित जळगाव जिल्हास्तरीय कार्यकर्ता अधिवेशन रविवारी (दि. ७ जून) अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या अधिवेशनासाठी मुंबईहून सुमारे ३० पदाधिकारी तर जळगाव जिल्ह्यातील सुमारे १,००० कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळी १० वाजता प्रार्थनेने अधिवेशनाची सुरुवात झाली. खान्देशातील ४७ श्री अनिरुद्ध उपासना केंद्रांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून संस्थेच्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी जळगाव जिल्ह्यातील ६२ केंद्रांच्या प्रगतीचा आढावा मांडण्यात आला. संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरे, समाजोपयोगी सेवा उपक्रम तसेच आपत्ती व्यवस्थापन (डिझास्टर मॅनेजमेंट) अभ्यासक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण उपक्रमांतर्गत ७०० सीड बॉलचे वाटप करण्यात आले. विविध सामाजिक व आध्यात्मिक उपक्रमांबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून समाजसेवेची प्रेरणा देण्यात आली.

सायंकाळी ५.३० वाजता अभंग सत्संगाच्या सादरीकरणाने अधिवेशनाचा समारोप झाला. उपस्थित भक्तांनी भक्तिरसात तल्लीन होत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शांतीपाठानंतर अधिवेशनाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अनिरुद्ध उपासना केंद्र, अमळनेरच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound