
रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी नितीन प्रकाश पाटील तर व्हाईस चेअरमनपदी पुरुषोत्तम तुकाराम पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माजी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदांसाठी खरेदी-विक्री संघाची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत चेअरमन पदासाठी नितीन पाटील आणि व्हाईस चेअरमन पदासाठी पुरुषोत्तम पाटील यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज प्राप्त झाले. अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
यावेळी आयोजित सभेत माजी आमदार अरुण पाटील यांनी मनोगत व्यक्त करत नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच संघाच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेऊन संस्थेची प्रगती साधावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सभेला बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील, उपसभापती पंकज पाटील, संचालक मंदार पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, नगरसेवक राजेंद्र चौधरी, शिवसेना शिंदे गटाचे वाय. व्ही. पाटील, सोपान पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय संचालक निलेश चौधरी, यशवंत महाजन, किशोर पाटील, रमेश पाटील, जिजबराव चौधरी, सिताराम महाजन, लक्ष्मण मोपारी, सुरेश पाटील, निळकंठ चौधरी, ज्ञानेश्वर धनगर, बिसन सपकाळ, तुषार मानकर, वासुदेव पाटील, नयना पाटील, उर्मिलाबाई पाटील, पी.आर. पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन व्यवस्थापक विनोद चौधरी यांनी केले.



