Home पर्यावरण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पारोळा नगर परिषदेकडून वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पारोळा नगर परिषदेकडून वृक्षारोपण

0
11


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत पारोळा नगर परिषदेमार्फत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारांना अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा आणि वृक्षसंवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश नागरिकांना देण्यात आला.

या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन पारोळा नगर परिषदेचे लोकनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत भिकनराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. वाढते जागतिक तापमान, पर्यावरणाचा ऱ्हास आणि बदलते हवामान यांसारख्या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत नगर परिषद प्रशासनाने हा उपक्रम राबविला.

कार्यक्रमास उपनगराध्यक्ष रोहन मोरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, नगरसेवक सुदाम चौधरी, दीपकभाऊ अनुष्ठाण, नजीरखान बेलदार, भूषणभाऊ टिपरे, इमरान खान सलीम खान, दगडू पवार, बापूसाहेब मिस्तरी, छोटूभाऊ पाटील यांच्यासह नगर परिषदेतील नगरसेवक, नगरसेविका आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यालय अधीक्षक यामिनी जटे, रचना सहाय्यक साक्षी मराठे, आस्थापना प्रमुख अनिल तीदमे, लेखापाल दीपक महाजन, अंतर्गत लेख परीक्षक सार्थक मोरस्कर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत सोमा माळी, सभा अधीक्षक तथा स्वीय सहाय्यक किशोर चौधरी, रमेश मोरे, शहर समन्वयक शुभम कंखरे, राहुल प्रजापती, आकाश सौदागर आणि कैलास वानखेडे यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.

नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व विशद केले. वाढत्या जागतिक तापमानवाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन अधिकाधिक वृक्ष लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले. येणाऱ्या पावसाळी हंगामात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्यांचे योग्य पद्धतीने संगोपन व संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनीही पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांचे जतन आणि संरक्षण किती आवश्यक आहे, यावर भर दिला. भावी पिढ्यांसाठी हिरवाईचा वारसा जतन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी वृक्षसंवर्धनासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.


Protected Content

Play sound