Home Cities जळगाव सुधाकर वारके यांचे निधन : उद्या अंत्यसंस्कार !

सुधाकर वारके यांचे निधन : उद्या अंत्यसंस्कार !

0
3


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील सुधाकर (बाबा ) अभिमन वारके यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव चे संचालक तसेच विदगाव परिसर जनता विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत सुधाकर वारके यांचे वडील, तसेच डॉ. नीलिमा प्रशांत वारके यांचे सासरे स्वर्गीय श्री. सुधाकर (बाबा) अभिमन वारके यांचे वृद्धापकाळाने आज दिनांक २ जून रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने वारके परिवारावर तसेच नातेवाईक, मित्रपरिवार आणि सर्व परिचितांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने एक ज्येष्ठ, स्नेही व आदरणीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांची अंत्ययात्रा ०३ जून रोजी सकाळी ०९:०० वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व वारके परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या वतीने भावपूर्ण प्रार्थना.


Protected Content

Play sound