फैजपूर, प्रतिनिधी | शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना ९९ व्या जयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
शहरातील फैजपूर नगरपालिका, अण्णाभाऊ साठेनगर (दक्षिण बाहेरपेठ) पोलिस ठाणे, शकुंतला मराठी मुलांची शाळा, बस् स्थानक, यावल रिक्षा युनियन स्टॉप मित्र परिवार, या ठिकाणी अभिवादन करण्यास आले. तसेच कार्यक्रमाला लहुजी सेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस ठाण्यातील कार्यक्रमाला उप विभागीय पोलीस अधिकारी पिंगळे, ए.पी.आय. वानखेडे, मनोज चंदनशिव, नगरसेवक इरफान, मनोज कापडे, किशन चंदनशिव, नाना मोची, भूषण भोई, राहुल भोई, घन:श्याम चंदनशिव, मुकेश चंदनशिव, कमलाकर बिऱ्हाडे, देवा तायडे, अमिन तडवी, जाकिर रौफ, शोएब, जितू, पिंटू तायडे, नगरपालिकेचे कर्मचारी, तसेच बसस्थानकातील कर्मचारी, शकुंतला शाळेचे शिक्षक उपस्थित होते. यावेळी अशोक भालेराव व अजय मेढ़े यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार भारत चौधरी यांनी मानले.