Home क्राईम भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू ; दोन जखमी

भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू ; दोन जखमी


मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोथळी ते मुक्ताईनगर रस्त्यावरील हॉटेल योगा समोर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात पवन नामदेव चौधरी (रा. कोथळी) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पवन चौधरी हा आपल्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ एएच ०४८३) ने जात होता. दरम्यान, रविवारी २४ मे रोजी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास कोथळी ते मुक्ताईनगर रस्त्यावरील हॉटेल योगा समोर समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने (एमएच १९ डीजी ९९२३) ने त्याला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात पवन चौधरी याचा गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला.

हा अपघात नामदेव प्रल्हाद भिल (रा. कोथळी) याने आपल्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून, हयगयीने आणि भरधाव वेगात चालवल्यामुळे घडल्याचे समोर आले आहे. या धडकेत नामदेव भिल आणि त्याचा स्वतःचा मुलगा तेजस नामदेव भिल हे दोघेही गंभीर जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून याबाबत दुचाकी चालक नामदेव भील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप वानखेडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound