चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कन्नड घाटातील पवित्र अशा मल्हारगड़ परिसरात आज दि. 31 जुलै म्हणजेच, गटारी (दीप पूजन अमावस्या) असल्यामुळे काही लोक त्याठिकाणी मद्यपान करण्यासाठी जात असतात. यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलिसांना निवदेन देऊन मदत करावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तसेच गड-किल्ल्यावर जाऊन दारू पिल्याने एखाद्या वेळेस तोल जाऊन किंवा पाय घसरून अपघात देखील होण्याची शक्यता असते. अशा या लोकांना मज्जाव करण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रत्येक गड-किल्ल्यावर करत असते. मल्हार गडावर देखील प्रतिष्ठानचे सदस्य गस्त मोहीम करणार असून तसेच पोलिस पथकांची साथ मिळाल्यास अधिक सोईचे होईल व कायदेशीर कारवाई करण्यास मदत होईल, असे निवेदन सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलिसांना दिली असून मल्हार गडावर ठोक मोहीम राबविण्यात येणार आहे. असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप घोरपडे, शरद पाटील, आर.डी.चौधरी, हेमंत भोईटे, मुराद पटेल, जितेंद्र वाघ, दिनेश घोरपडे, पप्पू पाटील, विजय गायकवाड, सचिन घोरपडे, दिनेश राठोड, अनिल धोत्रे व संजय पवार आदी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.