Home क्राईम स्विमिंग पुलाच्या आउटलेट मध्ये बालकाचा बुडून मृत्यू

स्विमिंग पुलाच्या आउटलेट मध्ये बालकाचा बुडून मृत्यू


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील सोनेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या स्विमिंग पुलाच्या आउटलेट असलेल्या हौदात ५ वर्ष वय असलेल्या कार्तिक ऊर्फ उत्कर्ष गणेश पाटील या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी संध्याकाळी ठीक ५ ते ६ वाजेच्या सुमारास घडली आहे.

त्याचे सविस्तर असे की, मूळचे एकुलती येथील रहिवाशी व हल्ली दर्शन पार्क येथे स्थाईक असलेले व संजय दादा गरूड यांच्या संस्थेत तोंडापूर येथे क्लार्क म्हणून कार्यरत असलेले गणेश पाटील हे आपल्या ५ वर्षाच्या कार्तिक व आपल्या मुलीसह स्विमिंग पुलात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. संध्याकाळी पोहण्याचा आनंद घेतल्या नंतर ते ओले झालेले कपडे बदलवण्यासाठी आपल्या मुलांना घेऊन रूम मध्ये गेले होते. मात्र कार्तिक हा आउटलेटचे वाहते पाणी बघून त्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पुढे पुढे जात आउटलेटचे पाणी ज्या ठिकाणी जमा होते. त्या चेंबर पर्यन्त गेला असता त्याचा चेंबर मध्ये तोल जाऊन तो चेंबर मध्ये असलेल्या पाण्यात बुडाल्याची माहिती स्थानिक रहिवाश्यांनी दिली.

या ठिकाणी घडलेल्या घटनेची चर्चा होताच कार्तिकला शोधण्यासाठी बरेच लोक स्विमिंग पुलाच्या पाण्यात उतरून शोध घेत होते. मात्र आउटलेटच्या पाण्याकडे कोणाचेही लक्ष न गेल्याने कार्तिकला शोधायला बराच वेळ लागला त्यामुळे त्याला जीवदान देता आले नाही. अशी खंत उपस्थित शोध कार्य करणाऱ्या लोकांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी ज्या ठेकेदाराला सुरक्षेचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. त्यांचे ट्रेनर वा सिक्युरिटी गार्ड नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. सुरक्षा रक्षक असते तर कदाचीत त्यामुळे कार्तिक चा जीव वाचवता आला असता अशी चर्चा ही होतांना दिसून आली. कार्तिकच्या पश्चात आई, वडील, काका, आजी, आजोबा, काका,काकू आणि ११ वर्षाची बहीण असा परिवार आहे. या बालकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound