Home क्राईम जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी ; ५ जणांवर गुन्हा दाखल

जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी ; ५ जणांवर गुन्हा दाखल


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील अडगाव तांडा परिसरात जुन्या वादातून एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना लाकडी दांडके, काठ्या आणि दगडांनी बेदम मारहाण करण्यात आली असून, ५ जणांविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण धनसिंग चव्हाण (वय २७, रा. अडगाव तांडा) हे १ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास बाजार आटोपून घरी परतत होते. यावेळी संशयित आरोपी राजेश साहेबराव राठोड याच्या घरासमोरून जात असताना, जुन्या वादाची कुरापत काढून प्रविण चव्हाण यांना आडविले. यावेळी राजेश राठोड, सुरेश राठोड, दीपक राठोड, अमोल राठोड आणि देविदास राठोड अशा ५ जणांच्या टोळीने बेकायदेशीर मंडळी जमवून फिर्यादीवर हल्ला चढवला.

संशयित आरोपींनी लाकडी दांडके आणि दगडांनी केलेल्या मारहाणीत प्रवीण चव्हाण आणि त्यांचे भाऊ प्रदीप चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. एवढेच नव्हे तर, फिर्यादीचे काका सोनूसिंग चव्हाण हे मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक निलेश साळुंखे हे करीत आहे.


Protected Content

Play sound