Home क्राईम अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

0
114


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने काहीतरी फूस लावून तिच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरातून अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर ती घरी परतली नाही, अखेर तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास स.फौ. श्यामकुमार मोरे हे करत आहेत.


Protected Content

Play sound