अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच आज १९ एप्रिल रोजी अमळनेर शहरातील सुभाष चौक परिसरात एक धक्कादायक मारहाणीची घटना घडली आहे. कृष्ण बॅटरी समोर या ठिकाणी एका व्यक्तीवर लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक रमेश पाटील (वय ५०, रा. साने नगर) हे आपल्या कामात असताना संशयित आरोपी उमेश निवृत्ती पाटील याने त्यांच्याकडे धाव घेतली. ‘तू माझ्या भावाला शिवीगाळ केली आहेस,’ असा खोटा आरोप करत आरोपी उमेशने अशोक पाटील यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. त्यानंतर संशयित आरोपींनी लाकडी दांडक्याने अशोक पाटील यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. इतकेच नाही तर, आरोपीने त्यांच्या तोंडावर बुक्क्या मारून गंभीर दुखापत करत धमकी दिली.

याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



